राजदंड येणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती!..

नवी दिल्ली, २५ मे २०२३: नवीन संसदेच्या उद्धाटनाला तामिळनाडूतील विद्धान पुरोहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेंगोल प्रदान करतील. सेंगोल हा एक राजदंड आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट १९४७ ला रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो प्रदान करण्यात आला होता. पुढे हा राजदंड गायबच झाला. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोधून काढलेला असून, नव्या संसदेत सत्तांतराच्या भारतीय परंपरेच्या या प्रतीकाची स्थापना होणार आहे.

नेहरुंच्या नंतर प्रथमच हा राजदंड नरेंद्र मोदी स्वीकारतील. सेंगोलाचा इतिहास असा आहे की, राजगोपालाचारी त्यावेळी मद्रास प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. भारतीत परंपरेनुसार राज्यांचे मुख्य पुरोहित नवीन राजाला सत्ताग्रहणप्रसंगी राजदंड देतात. असे राजगोपालाचारींनी नेहरुंना सांगितले. नेहरुंनी सांगितल्यावरुन राजगोपालाचारी यांनी तिरुवदुथुराई अधीनम मठ गाठले.

मद्रास प्रांतातील एका सुवर्णकाराला राजदंड बनवायला सांगितला. तिरुवदुथुराई अधीनम मठाचे राजपोरीहित श्री ला श्री अंबालावन देसिका स्वामीगल यांचे प्रतिनिधी श्री कुमारस्वामी थंबीरन राजदंडासह एका विशेष विमानाने दिल्लीला आले होते. स्वातंत्र्याच्या १५ मिनिटे आधी, थंबीरन यांनी माऊंटबॅटन यांना राजदंड सुपूर्द केला होता. राज्य हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून माऊंटबॅटन यांनी हा सेंगोल नेहरुंना दिला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा