समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरु होणार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिर्डीत लोकार्पण सोहळा होणार

मुंबई, २३ मे २०२३ : मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. २६ मे रोजी संध्याकाळी शिर्डी मध्ये लोकार्पण सोहळा होणार आहे. शिर्डी ते भरवीर असा ८० किलोमीटर महामार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन होऊन सहा महिने झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर महिन्यात लोकार्पण झाले होते. नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरील, नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला होता. आता दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला होत आहे.यामुळे नागपूर ते भरवीर असा ६०० किमीचा प्रवास समृद्धी महामार्गावरुन करता येणार आहे.

समृद्धी महामार्ग द्वारे राज्यातील १४ जिल्ह्यांना जोडणारा हा ७०११ कि.मी. लांबीचा महामार्ग आहे. ५५ हजार कोटी रुपये एवढे महाकाय तरतूद या महामार्गासाठी आहे. नागपूर ते मुंबईपर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग आहे. एकूण ७१० किलोमीटर लांबीचा असलेला हा महामार्ग तयार झाल्यावर मुंबई-नागपूर हे अंतर अवघ्या ६ तासामध्ये पार करणे शक्य होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा