लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू, हे नागरिक असतील पात्र

नवी दिल्ली, १ मार्च २०२१: जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा वयोमानानुसार लोकसंख्येचे लसीकरण करण्याचा पुढील टप्पा १ मार्च २०२१ पासून( आजपासून) सुरू होत आहे. या लसीकरणासाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया (www.cowin.gov.in वर) सुरू होईल. कोविन २.० पोर्टलवर किंवा आरोग्य सेतू इत्यादीसारख्या इतर माहिती तंत्रज्ञान ऍप्लिकेशन्सवर नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल आणि कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी लसीकरणासाठी भेट( अपॉईंटमेंट) निर्धारित करता येईल.
मात्र, वयोमानानुसार तसेच गंभीर आजार यानुसार कोणाकोणाला लसीकरण केले जाईल याबाबत माहिती असणे देखील आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यातील या लसीकरणासाठी कोणते नागरिक पात्र आहे ते जाणून घेऊया.
हे नागरिक असतील लसीकरणासाठी पात्र
१. गेल्या वर्षभरात हृद्यविकाराचा धक्का आलेला असणे आणि रुग्णालयात दाखल होणे.
२. पोस्ट कार्डियाक  ट्रान्सप्लॅन्ट / लेफ्ट वैन्ट्रिक्युलर असिस्ट डिवाईस (LVAD)
३. सिग्निफिकन्ट लेफ्ट व्हेन्ट्रीक्युलर सिस्टॉलिक डिस्फक्शन (LVEF <40%)
४. हृद्याच्या झडपेशी संबधित सर्वसाधारण वा गंभीर आजार
५. जन्मतः हृद्यय  विकार असलेले गंभीर PAH किंवा कारण माहिती नसलेले PAH
६. बायपास/अजियोप्लास्टी/मायोकार्डियल इन्फ्राक्शन केलेले हृदयाच्या वाहिनीशी संबधीत आजार असलेले व उपचाराधीन रक्तदाव वा मधुमेह
७. उपचार सुरू असलेला अंजायना आणि रक्तदाब/ मधुमेह
८. CT/MRI काढून नोंदवलेला स्ट्रोक आणि उपचार सुरू असलेला रक्तदाब/मधुमेह
९. पल्मनरी आर्टरी उच्च रकतदाब व उपचाराखालील उच्च रक्तदाब/मधुमेह
१०. मधुमेह (> १० वर्षे तसेच गुंतागुंतीचा मधुमेह) आणि उच्च रक्तदाब उपचार सुरू असलेला
११. मूत्रपिंड/यकृत/हिमॅटोपोयटिक स्टेम सेल रोपण झालेले / त्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले
१२. शेवटच्या स्टेजमधील मूत्रपिंड विकार हिमीओडायलिसिस/ CAPD
१३. भरपूर काळ ओरल कॉर्टीकोस्टीरॉईड्सचे सेवन/ इम्युनोसप्रेसंट औषधोपचार
१४. डिकॉम्पेन्सेटेड सिऱ्हॉसिस
१५. गंभीर श्वसनमार्गाचे आजार आणि त्यासाठी गेल्या दोन वर्षापासून रुग्णालयात उपचाराधीन/ FEV1 <५०%
१६. लिंफोमा/ल्युकेमिया/मायलोमा
१७. कोणताही गंभीर कर्करोग १ जुलै २०२० ला व नंतर निदान झालेले वा आता उपचाराधीन कर्करोग रुग्ण
१८. सिकल सेल आजार/ बोन मॅरो फेल्युअर/ अप्लॅस्टिक अनिमिया/ थॅलसेमिया मेजर
१९. प्रायमरी इम्युनोडेफिशिअन्सि/ एचआयव्ही संसर्ग
२०. मानसिक वा बौद्धिक विकलांगता/ स्नायूंशी संबधीत विकलांगता आजार/ श्वसनमार्गात पोचलेला अॅसिड हल्ला/ सहकार्य आणि मदतीची गरज असणाऱ्या विकलांग व्यक्ती/ बहिरेपणा, अंधत्व अश्या अनेकस्वरूपी विकलांगता
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा