गोल पोस्ट स्पॉटलाइट नोकराने दिली होती पोलिसांना सुशांतच्या आत्महत्याची खबर

नोकराने दिली होती पोलिसांना सुशांतच्या आत्महत्याची खबर

मुंबई, दि. १४ जून २०२०: वर्ष २०२० हे बॉलीवूडसाठी अत्यंत वाईट ठरले आहे. भविष्यातील बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून पहिला जाणारा अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली. वांद्रे येथील घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत वांद्रे येथील घरात एकटाच राहत होता.

सुशांतने केलेल्या आत्महत्याची खबर त्याच्या घरात काम करत असलेल्या नोकराने पोलिसांना दिली. यापूर्वी सुशांत सिंग राजपूतने सकाळी दहा वाजता ज्यूस मागितला होता. तो पिल्यानंतर सुशांत आपल्या खोलीत गेला. साडेअकराच्या सुमारास घरातील नोकराने खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने घरातील व्यक्तींनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस सुशांतच्या वांद्रेस्थित असलेल्या घरी पोहोचले. सुशांतचे स्नेही आणि पोलिसांनी दरवाजा तोडून जेव्हा आत घुसले तेव्हा सुशांत फासावर लटकलेला दिसला.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सुशांतचे काही मित्र त्यांच्यासोबत घरात होते. घरातील वातावरण नेहमीसारखेच होते. सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या अंगावर टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट होती.

पोलिस सुशांत सिंगच्या शेजार्‍यांचीही चौकशी करत आहेत. सुशांतसिंग राजपूत यांचे कुटुंब पटण्यात राहत आहे. पोलिसांचा असा दावा आहे की सुशांतसिंग राजपूत गेल्या ६ महिन्यांपासून नैराश्याने ग्रस्त होता. त्याच्या आत्महत्येचे कोणतेही कारण समोर आले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version