धक्कादायक प्रकार ! शिवशाही बसचा पत्रा उडून स्कूल बसवर आदळला

संगमनेर, १ जुलै २०२३: पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही बसचा पत्रा उडून तो खाजगी स्कूल बसला धडकला. सुदैवाने पत्रा मागील बाजूस अडकल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण काही वेळ विदयार्थी मात्र घाबरले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवशाही बस ही पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. बस चंदनपुरी घाटात आली असता तिचा पत्रा उडाला. नेमकी याच वेळेस शालेय विद्यार्थ्यांना घेवून बस रस्त्याने जात होती. शिवशाही बसचा उडालेला पत्रा सुदैवाने स्कूल बसच्या मागील बाजूस धडकला व तो बसलाच अडकला. यामुळे मोठा आवाज झाला. अचानक पणे झालेल्या घटनेने विधार्थी व चालकही घाबरले होते.

स्कूल बस तात्काळ थांबविण्यात आली. शिवशाही बसही थांबली. या अपघातात बस मधील प्रवासी, विधार्थी सर्वच खाली उतरले. नागरिंकही जमा झाले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. याची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आली. पोलिस ही घटनास्थळी आले. बराच वेळ या बस उभ्या होत्या. पाहणी केल्यानंतर दोन्ही बस पुन्हा मार्गस्थ झाल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा