कानपूर, दि. ५ जुलै २०२० : कानपूर पोलिसांशी झालेल्या चकमकीच्या प्रकरणात कुख्यात गुंड विकास दुबेचा एक साथीदार दयाशंकर अग्निहोत्री याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पोलिसांशी चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. चकमकीपूर्वी विकास दुबे याला पोलिस चौकीतून फोन आला असल्याचे दयाशंकर यानी पोलिसांना सांगितले आहे की, चकमकीच्या वेळी विकास दुबे स्वत: बंदुकीने पोलिसांवर गोळीबार करीत होता. ही बंदूक दयाशंकर याच्या नावावर होती.
रेडच्या आधी विकास दुबे याचा फोन आला
विकास दुबे याने बेकायदेशीर व गुंडप्रवृत्ती असलेल्या २५ ते ३० लोकांना बोलावले होते, अशी माहिती दयाशंकर यांनी दिली. दयाशंकर म्हणाले की, पोलिस कारवाईच्या अगोदर विकास दुबेला एक फोन आला होता, जो पोलिस स्टेशनचा असण्याची शक्यता असल्याचे दयाशंकर म्हणाला. दयाशंकर यांनी सांगितले की विकास दुबे याची गुंडां बरोबरची बैठक गावाजवळ असलेल्या बागेत व्हायची. विकास दुबे आपल्या सहकाऱ्यांना फोन करायचा.
वृत्तसंस्था ए एन आय च्या म्हणण्यानुसार, दयाशंकर ने सांगितले की पोलिसांनी छापा टाकण्याआधी दूबेला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्यानंतर विकास दुबे याने पंचवीस ते तीस लोकांना बोलावले. विकास दुबे याने स्वतः पोलिसांवर गोळीबार केला. दयाशंकर म्हणाला की चकमक सुरू असताना तो स्वतः एका खोलीमध्ये बंद होता. त्यामुळे तो जास्त काही पाहू शकला नाही.
दयाशंकर वर २५ हजारांचे बक्षीस
दयाशंकर विकास दुबेच्या १८ गुन्ह्यांमध्ये देखील सामील आहे. या गुन्ह्यांसाठी पोलिसांनी दयाशंकर वर २५ हजारांचे इनाम ठेवले आहे. बिकरू गावामध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये दयाशंकर देखील सहभागी होता.
रविवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी दयाशंकरला अटक केली. कानपूर पोलिसांनी सांगितले की, कल्याणपूरच्या जवाहर पुरम येथे पोलिस पथकाने दयाशंकरला घेराव घालून आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण दयाशंकर शरण येण्याऐवजी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यादरम्यान पोलिसांनीही प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात दयाशंकरच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर तो जखमी झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी