एसआयटीने आजही सादर केला नाही अहवाल, लागणार आणखी तीन दिवस

लखनऊ, १७ ऑक्टोबर २०२०: हाथरस सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात तपासासाठी गठित विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल दाखल करण्यास विलंब झाला आहे. यापूर्वी अहवाल दाखल करण्याची मुदत १० दिवसांनी वाढविण्यात आली होती.

एसआयटी आपला तपास अहवाल १७ ऑक्टोबरला सरकारला सादर करणार होती. हाथरस प्रकरणाचा अहवाल एसआयटीला सादर करण्यास किमान तीन दिवस लागू शकतात, असे सांगितले जात आहे. हाथरस प्रकरणाची चौकशी करून एसआयटी परत आली आहे पण अद्याप अहवाल तयार नाही.

हाथरस सामूहिक बलात्काराची घटना १४ सप्टेंबर रोजी घडली तर पीडितेचा २९ सप्टेंबरला मृत्यू झाला. यानंतर घाईघाईने प्रशासनाने पिडीतेवर अंत्यसंस्कार केले, हा बराच वादाचा विषय होता. पीडितेच्या कुटूंबियांबाबत प्रशासनाच्या मनोवृत्तीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या सर्व वादानंतर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात एसआयटीची स्थापना केली. एसआयटीला ७ दिवसात अहवाल देण्यास सांगितले. यावेळी एसआयटीने स्थानिक अधिकारी, पीडित कुटुंबातील सदस्य, ग्रामस्थ व अन्य संबंधित लोकांची चौकशी केली.

एसआयटीने तपासासाठी अतिरिक्त दहा दिवसांची मागणी केली होती. यानंतर एसआयटीला हा अहवाल यूपी सरकारला १७ ऑक्टोबरला सादर करावा लागणार होता. एसआयटीने केलेल्या सुरुवातीच्या तपासाच्या आधारे हाथरस एसपीला निलंबित करण्यात आले आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा