जगभरातील सर्वात लहान प्राणी……

पुणे, २९ जानेवारी २०२१: आपल्या जगभरात विविध प्रकारचे सजीव प्राणी पशु आहेत आणि त्यांच्यातील वेगळेपणामुळे हे प्राणी लक्ष वेधून घेतात. आज आपण जगातील सर्वात लहान प्राणी जे सर्वांचे लक्ष वेधून घेतात त्या बद्दल जाणून घेणार आहोत.

सर्वात लहान ससा (पिग्मी ससा)
ससाच्या प्रजाती मधील पिग्मी ससा हा पश्चिम अमेरिकेतील प्राणी आहे.पिग्मी ससे ९.२५ ते ११.६ इंच दरम्यान आसतात.जगातील सर्वात लहान लेपोरिड आहेत. यामध्ये मादी जरा नर पेक्षा मोठी असते. पण, हि प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असे या सरकारने स्पष्ट केले आहे.

 

सर्वात लहान शार्क (ठेंगणा लालटेन शार्क)
ठेंगणा लालटेन शार्क फक्त कोलंबिया आणि व्हेनेझुएलच्या खोल भागात दिसून येतात.हे शार्क जगातील सर्वात छोटा प्राणी आहे. जे फक्त ८.३ इंच मोठे आहेत. ठेंगणे लालटेन शार्क माणसाच्या  हातापेक्षा ही लहान असतात.

सर्वात लहान मासा (पेडोसिप्रिस)
या माश्याच्या प्रजातीतील सर्वात लहान प्रौढ मादी ७.९ मिमी (०.३१ इंच) होती आणि मोठा मासा १०.३ मिमी (०.४१ इंच) आहे. पेडोसिप्रिस सा या ग्रहावरील सर्वात छोटा मासा आसून हे बर्निओ, सुमर्टा आणि ब्रिटन या दक्षिण आशियाई  बेटांवरील प्रवाहात आढळतात.

 

सर्वात छोटा साप (ब्राहमिनी अंध साप)
ब्राहमिनी अंध साप हे जगातील सर्वात लहान साप आहे. ये बार्बाडोसमध्ये आढळतात आणि सुमारे ४.१ इंच लांबीपर्यंत त्यांची वाढ होते. ते नाॅनवाॅमेन ब्लाइंड स्नेक प्रजातीचे आहेत.

 

सर्वात छोटा माकड (पिग्मी मार्मोसेट्स)
पिग्मी मार्मोसेट्स माकड हे जगातील सर्वात छोटे माकड आहे.ते मानवी बोटाच्या आकाराचे आसतात. ते ४.६ ते ६.२ इंच उंच आसतात. ब्राझील, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, बोलिव्हिया आणि पश्चिम अमेझाॅन  बेसिन मध्ये आढळून येतात.

सर्वात छोटा पक्षी (बी हमिंगबर्ड)
बी हमिंगबर्ड या पक्ष्याला हेलना हमिंग बर्ड म्हणून ही ओळखले जाते. जगातील सर्वात लहान पक्षी आहे. या प्रजातीतील मादीचे वजन २.६ ग्रॅम (०.०९२ औस) असते आणि ते ६.१ सेमी (२.४ इंच) लांबीचे आसतात. ते नरापेक्षा किंचित मोठे आसतात. ज्याचे सरासरी वजन १.९५ ग्रॅम (०.०६९ औस) आणि लांबी ५.५ सेमी (२.२ इंच) आसते.

लांबीनुसार सर्वात लहान सस्तन प्राणी (किट्टीचा हाॅग नाॅज्ड बॅट)
किट्टीचा हाॅग नाॅज्ड बॅट लांबीनुसार जगातील सर्वात लहान  सस्तन प्राणी आहे.बॅट अर्थात वटवाघूळ आहे. मुळचे थायलंड आणि बर्मा येथील हे आसून चुनखडीच्या गुहांमध्ये राहतात. ते सरासरी १.१ ते १.३ इंच दरम्यान लांब आसतात आणि त्यांचे वजन केवळ ०.०५-०.०७ औस (१.५-२ ग्रॅम) आसते.

सर्वात लहान बेडूक (पेडोफ्रिन अमऊएन्सीस)
२००९ मध्ये  पापुआ न्यू गिनीमध्ये एका अमेरिकन शास्त्रज्ञाने पेडोफ्रिन अमऊएन्सीस फ्राॅगची लांबी फक्त ७.७ मिलीमीटर इतकी आसल्याचे म्हटंले जाते. हा बेडूक कचर्यामध्ये आढळून आला होता. पाठीचा कणा असलेला हा सर्वात लहान ज्ञात प्राणी आहे.

तर हे होते जगभरातील  सर्वात लहान आणि सर्वसामान्यांचे लक्ष्य वेधून घेणारे प्राणी. जे आपल्या वेगळेपणामुळे जगभरातील लहान प्राण्यांच्या यादीत समावेश झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा