गोल पोस्ट महाराष्ट्र श्रीक्षेत्र तुळापूरची मृदा जाणार अयोध्येच्या रामजन्मभूमीला..!

श्रीक्षेत्र तुळापूरची मृदा जाणार अयोध्येच्या रामजन्मभूमीला..!

तुळापूर, दि. १ ऑगस्ट २०२० : अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तुळापूर येथील मृदा पाठवण्यात येणार आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ आहे.

आयोध्यामध्ये पुढील आठवड्यात श्रीराम मंदिराचा भव्य भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मृदेची विधिवत पूजा करून ही मृदा गोविंदगिरी महाराजांकडे आज सुपूर्द करण्यात आली.

या मृदेचे चांदीच्या कलशामध्ये श्रीक्षेत्र तुळापूर आणि हिंदू जागरण मंचच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्याकडे ही मृदा सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमावेळी श्रीक्षेत्र तुळापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असल्याने या क्षेत्राला इतिहासात महत्वाचे स्थान आहे. त्यात अशा पवित्र ठिकाणची माती श्रीराम मंदिरासाठी जाणार असल्याने तुळापूरला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version