राज्याच्या गृहविभागाने जारी केले बदलीचे आणि पदस्थापनेचे आदेश

जालना, १ फेब्रुवारी २०२४ : राज्याच्या गृहविभागाने जारी केलेल्या आदेशानुसार जालना पोलिस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी अजय बन्सल हे बृहन्मुंबई विभागाचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. तसेच जालन्यात कार्यरत असलेले प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची अप्पर पोलीस आयुक्त, पुणे (क्राईम) पदोन्नती झाली आहे.

त्याचबरोबर आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार प्रकरणी निलंबित असलेल्या तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांची नव्याने पदस्थापना झाली आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांची मुंबई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पदी तर उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांची छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदस्थापना झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा