मुंबई, २४ सप्टेंबर २०२०: गुरुवारी शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण बघण्यास मिळाली. या आठवड्यात सातत्यानं शेअर बाजारांमध्ये घसरण बघण्यास मिळतेय. शेअर बाजाराच्या घसरणीमध्ये छोटे शेअर्स मोठ्या संख्येनं घसरले. आज शेअर बाजारावर विक्रीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
या आठवड्यात सोमवारी देखील बाजारात मोठी घसरण बघण्यास मिळाली होती. बाजारात होत असणाऱ्या सततच्या घसरणीमुळं गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. शेअर बाजाराच्या घसरणीमागं अनेक कारणं आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या वक्तव्यावरून असं सूचित होतं की, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत नाजूक आहे.
गुरुवारी, सप्टेंबरच्या सिरीज मधील एफ अँड ओ सौद्यांची समाप्ती होती. आज एक्सपायरी असल्यामुळं देखील बाजारावर मंदीचं सावट पसरलं होतं. जागतिक स्तरावर बाजारात विक्रीचा दबाव सतत वाढत आहे. फ्रान्स आणि यूकेसह युरोपमध्ये कोरोनाची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. यामुळं जगभरातील शेअर बाजारामध्ये चिंता निर्माण झाली आहे.
बीएसईचा सेन्सेक्स १,११५ अंकांनी म्हणजेच २.९६ टक्क्यांनी घसरून ३६,५५४ वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी फिफ्टी निर्देशांकात २८३ अंकांनी माझेच २.४६ टक्क्यांची घसरण नोंदून ते ११,२२२ वर बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांक अडीच टक्क्यांनी घसरण झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे