जानाईतून उन्हाळी आवर्तनास सुरुवात

बारामती, दि.१० मे २०२०: बारामती तालुक्यातील सुपे येथील भागाला वरदान ठरणाऱ्या जनाई उपसा जलसिंचन योजनेतुन शनिवारी ( दि.१०) सकाळी आकरा वाजल्यापासून पाण्याचे आवर्तन सोडण्यात सुरुवात करण्यात आली.

टप्पा क्र. १ ७५० अश्वशक्तीच्या दोन पंपाद्वारे तर टप्पा क्रमांक दोन मधून १००० अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे
८४ क्यूसेक वेगाने उजव्या आणि डाव्या कालव्यातुन पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत मागील वेळी काही ठिकाणचे पैसे येवूनही पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे सध्या सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन प्रथम कुतवळवाडी येथील ओढा जोड प्रकल्पाकडे सोडण्यात येणार आहे.

या पाण्याचा सध्या शेतात असणाऱ्या मका, कडवळ, भाजीपाला यांना चांगला फायदा होणार आहे. दौंडमधील वासुंदे तर जिरेगाव येथील शेतकऱ्यांनी पैसे भरल्याने तिकडे पाणी सोडण्याचे नियोजन असून त्यानंतर पैसे येणाऱ्या भागात पाणी सोडण्यात येणार
असल्याची माहिती जनाईचे शाखा अभियंता अशोक कुवर यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी :अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा