दिल्ली, २७ ऑगस्ट २०२० : देशात २५ मार्च पासून लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. त्या दिवसापासुन ते आत्तापर्यंत देशातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मस्जिद बंद ठेवण्यात आली होती. या दरम्यानच्या काळामध्ये अनेक सण व उत्सव येऊन गेले. मात्र, या काळात देखील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. आगामी काळात मोहरम येत आहे, या पार्श्वभूमीवर मोहरम यात्रा काढण्यास परवानगी मिळावी म्हणून मुस्लिम बांधवांकडून मागणी करण्यात येत आहे. याबाबत आज सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. मोहरम यात्रा काढण्याबाबत सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले आहे.
मोहरम यात्रा परवानगीसाठी केल्या गेलेल्या याचिकाला सुप्रीम कोर्टाने नाकारले आहे, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की, “कोर्ट असल्या उत्सवांना कधीही परवानगी देणार नाही ज्यामुळे सामूहिक गर्दी होईल त्यातून लोकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होईल.” याचिका दाखल करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले आहेत की, त्यांनी ही याचिका अलाहाबाद कोर्टामध्ये दाखल करावी.
मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे, ए. एस. बोपन्ना आणि वी. रामसुब्रमण्यन यांनी म्हंटले की, “ही याचिका एका विशिष्ट जाती समुदाय विषयी निर्णय देण्याबाबत ठरेल त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.” दरम्यानच्या काळात अनेक महत्त्वाचे उत्सव होऊन गेलेले ज्यामध्ये हिंदू मुस्लिम फार्सी सर्व समुदाय यांचा समावेश होता. यापैकी कोणत्याही उत्सवासाठी करताना परवानगी दिली नव्हती परिणामी ही याचिका देखील कोर्टाने फेटाळलेली दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: संदिप राऊत