नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर २०२२ : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) विरोधात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
गेल्या वर्षी आयपीएल कोरोना महामारीच्या काळात खेळली गेली. गेल्या वर्षी या स्पर्धा दोन ठिकाणी झाल्या. आयपीएल २०२१ चा पहिला भाग हा भारतात झाला होता. पण काही खेळाडू कोरोणा पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवली गेली. याच मुले गेल्या वर्षी दिल्लीतील एका व्यक्तीने आयपीएल सामन्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या याचिकेत त्यांनी आयपीएल सामने आयोजित केल्याबद्दल, आणि कोविड महामारीच्या काळात खेळाडूंचा जीव धोक्यात घातल्याबद्दल बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.त्याचबरोबर आयपीएल सामन्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती.
दरम्यान. कोरोना काळात आयपीएलचे सामने आयोजित करण्याच्या मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की याचिकेवर सुनावणी करण्याचे कोणतीही कारण आम्हाला दिसत नाही. न्यायालयाच्या मते कालांतराने काही याचिका अप्रासंगिक बनल्या आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश लळित आणि न्यायमूर्ती एस आर भट यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव