सांगली जिल्ह्यात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने शिक्षकाला चिरडले

सांगली,दि.१२ मे २०२० : लॉकडाऊन काळात पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतनीस म्हणून काम करत असलेल्या एका शिक्षकाचा चेक पोस्टवरुन पळालेल्या एका भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घातल्याने जागीच मृत्यू झाला.

नानासाहेब सदाशिव कोरे असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील डफळापूर (ता. जत) जवळच्या चेकपोस्टवर हे शिक्षक पोलिसांना मदतनीस म्हणून कार्य करत होते. डफळापूर स्टँडजवळ आज ( मंगळवारी) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

शिंगणापूरनजीकच्या चेक नाक्यावर हे शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होते. त्याचवेळी सिमेंटने भरलेला ट्रक कर्नाटकातून जतकडे जात होता. या घटनेनंतर ट्रक चालक हणमंत रामचंद्र मुरड (वय ३७,रा.नाथाचीवाडी ता.दौंड जि.पुणे), ट्रक नं.एम एच १२ एल डी ९७४९ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, डीवायएसपी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक राजाराम शेळके घटनास्थळी दाखल आहेत. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. अधिक माहिती पोलिसांकडून देण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा