गोल पोस्ट स्पॉटलाइट या दिवशी होणार ‘आदिपुरूष’ चा टिझर रिलिज

या दिवशी होणार ‘आदिपुरूष’ चा टिझर रिलिज

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२ : बाहुबली च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांना प्रभास ला पुन्हा तशा मोठ्या आणि भव्य अशा भूमिकेत बघायची इच्छा आहे. मध्यंतरी आलेला साहो आणि ‘राधेश्याम’ ने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. पण आता प्रभास हिंदी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट घेऊन येत आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांचा भगवान पराक्रमी राम यांच्यावरील ‘आदिपुरुष’ हा महत्त्वकांशी चित्रपट केवळ आतापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी चित्रपट ठरणार नाही तर भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा आहे.

आदिपुरुष या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून लवकरच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार प्रभासचा चित्रपटातील फर्स्ट लुक २ ऑक्टोबरला गांधी जयंतीला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओम राऊत यांचा ‘तानाजी’ नंतर हा दुसरा मोठा बॉलीवूड चित्रपट आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. आदिपुरुष बद्दल बोलायचं तर हा सिनेमा १२ जानेवारीला २०२३ रोजी एकाच वेळी हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे..

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version