मुंबई, ६ ऑक्टोबर २०२२ : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे आदिपुरुष या चित्रपटाचा टिझर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. आदिपुरुष या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे, जेव्हापासून असा चित्रपट येणार आहे. हे घोषित झाले होते तेव्हापासून खरं तर या चित्रपटाच्या वेगवेगळ्या अर्थाने सोशल मीडियावरती चर्चासुरू झाली होती.
सुपरस्टार प्रभास ची प्रमुख भूमिका असलेल्या व राष्ट्रीय पुरस्कार विजेते,चित्रपटाचे निर्माते, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरूष चित्रपट प्रदर्शनाआधीच या सिनेमाच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर या सिनेमातील सैफ अली खानच्या (रावण) लूक चा खुप मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे .याशिवाय सिनेमाचा टिझर पाहिल्यानंतर चाहते यात वापरलेल्या VFX वरही खिल्ली उडवत आहेत.
टीजर मधील रावणाची भूमिका आणि लुक पाहून नेटकरी चांगलेच भडकले ले आहेत, आदिपुरुषच्या VFX वरूनही नेटकरी खूप ट्रोल करत आहेत. या चित्रपटाचे ॲक्शन सीन हॉलीवुड सिनेमातून कॉपी केलंचं काही नेटकरायचं म्हणणं आहे, राईज ऑफ द प्लॅनेट, गेम्स ऑफ थ्रोन्स, यासारख्य हॉलीवुड चित्रपटांमधून काही सीन्स कॉपी केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. काहीनी तर आदिपुरुष टीझर म्हणजे एखादया कार्टून फिल्म पाहिल्यासारखा वाटतंय असेही म्हटले आहे.
दरम्यान आदिपुरुष हा आतापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी चित्रपट ठरणार आहे, त्याचं बजेट ५०० कोटी रुपये आहे, तर हा सिनेमा १२ जानेवारीला २०२३ ला रोजी एकच वेळी हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम, आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार प्रसाद सुतार, व राजेश नायर यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव