बारामती ४ फेब्रुवरी २०२१ : शहरात झालेल्या विविध घरफोड्या,चोरीतील हस्तगत केलेला मुद्देमाल बारामती शहर पोलिसांकडून फिर्यादींना परत देण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या उपस्थितीत हा मुद्देमाल परत देण्यात आला.
शहरात ६ मार्च २०२० रोजी संतोष दत्तात्रय शिंदे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना येथील खत्री पार्कमधील त्यांचा गजानन बंगला फोडत चोरट्यांनी घरातील ६५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. दुसऱया घटनेत ३० एप्रिल २०१९ रोजी वसंतनगरमधील संतोष म्हस्कू गायकवाड यांच्या घरी गेलेल्या चोरीत ६४, १०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले होते.
या दोन्ही गुन्ह्यात पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वाघमारे, गुन्हे शोध पथकाचे दादा डोईफोडे, अोकांर सिताप, सुहास लाटणे, अविनाश दरादे, दशरथ इंगोले, योगेश कुलकर्णी, तुषार चव्हाण, अकबर शेख, अतुल जाधव यांनी तपास करत बेरड्या उर्फ नियोजन संदीप भोसले (वय २८, रा. सोनगाव, ता. बारामती) याला अटक करत त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला होता.
हा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. याप्रसंगी परिविक्षाधीन उपअधीक्षक मयुर भुजबळ, कॅनरा बॅंकेचे मुख्य प्रबंधक शैलेश दराडे, शिंदे, उपनिरीक्षक दराडे, हवालदार ढोले आदी उपस्थित होते. चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याने समाधान वाटल्याचे सांगत फिर्यादींनी पोलिस दलाचे आभार मानले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव