बारामतीवर नजर ठेवणार तिसरा डोळा

बारामती, १५ डिसेंबर २०२०: बारामती शहर भयमुक्त शहर ही संकल्पना डोळ्यासमोर धरून कामाची सुरवात केलेल्या पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे गुन्हेगारी, भुरट्या चोऱ्या, दरोडे, यासारख्या मोठ्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन लोक वर्गणीतून सीसीटीव्ही बसवणार आहेत.

बारामतीच्या सर्व रस्त्यावर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना च्या मार्गांवर सिसिटीव्ही बसवणार असल्याचं सांगितलं. यासाठी एका कंपनीला काम दिलं असून आता शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर सीसीटीव्ही लक्ष ठेवणार आहे.

बारामती शहरातील चोरी, चैन स्कॅचिंग सारखे प्रकार रोखण्यासाठी व या गुन्हेगाराना चाप देण्यासाठी बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सोनसाखळी चोरांची नावं कळवा आणि वीस हजार मिळवा अशी योजना राबविली. दुसऱ्या दिवशी बारामतीत येणाऱ्या सर्व लहान मोठ्या रस्त्यांवर लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

फक्त रस्त्यांवरच नाही तर काही महत्वाच्या ठिकाणी गुप्त कॅमेरे ही बसविण्यात येणार असल्याची माहिती नामदेव शिंदे यांनी दिली. त्यामुळं शहरातील प्रत्येक चौकातील हालचालीं पोलिसांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहेत. त्यामुळं मस्तीत असाल तर शिस्तीत रहा.. असा संदेश यानिमीत्तानं पोलिसांकडून दिला जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा