कोरोनाची तिसरी लाट लांब नाही, उच्च न्यायालयानं केंद्र आणि केजरीवाल सरकारला फटकारलं

नवी दिल्ली, १९ जून २०२१: दिल्ली हायकोर्टानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सामान्य जनतेद्वारे मास्क न वापरल्याबद्दल स्वतः दखल घेतलीय. दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणावर केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलंय. आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून फार दूर नाही, अशी टिप्पणीही दिल्ली उच्च न्यायालयानं केलीय. असं असताना देखील जनतेकडून सोशल डिस्टंसिंग सारख्या नियमांचं काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही.

वास्तविक, एम्सच्या एका डॉक्टरनं दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांना काही छायाचित्रं पाठवली होती. दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चे नियम कशाप्रकारे मोडले जात आहे हे या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. बाजारपेठांपासून ते रस्त्यावर लोक मास्क वापरत नाहीत. ही छायाचित्रं पाहिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वत: दखल घेतली आणि या प्रकरणाची सुनावणी घेतली.

कोर्टानं म्हटलं आहे की, दिल्लीतील सर्व बाजारामध्ये कोरोना रोखण्यासाठी सर्वसामान्यांना अधिक संवेदनशील बनवावं, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांना सांगण्यात आलं आहे. दिल्लीत चालू असलेल्या साप्ताहिक बाजारपेठेत जास्त गर्दी होऊ नये व तेथे सामाजिक अंतराचे नियम पाळले पाहिजेत, असंही कोर्टानं म्हटलंय. तसंच सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता करावी, असंही कोर्टानं म्हटलंय.

यावेळी कोरोना रोखण्याच्या प्रयत्नात जर थोडीशी चूक झाली तर तिसरी लाट दुसर्‍या लहरीपेक्षा कितीतरी पटीनं भयंकर असल्याचं सिद्ध होऊ शकते, असा इशारा कोर्टानं दोन्ही सरकारांना दिला. कोर्टानं या प्रकरणावर सुनावणीसाठी पुढील तारीख ९ जुलैची तारीख निश्चित केली आहे. यापूर्वी, केंद्र आणि राज्य सरकार या दोघांना दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा