बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित

14

मुंबई, १० जानेवारी २०२३: बॉलीवूड चित्रपटसृष्टीत वादाचा विषय ठरलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यामध्ये दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने वादाला सुरुवात झाली होती. वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींनी या पोशाखाबद्दल स्वतःची मते मांडली. सर्व परिस्थितीचा विचार करून सेन्साॅर बोर्डाने चित्रपटातील १० दृश्यांवर कात्री देखील चालवली.

तसेच चित्रपटात सनातन धर्माचा अपमान केला असा आरोप हिंदू संघटनांनी केला होता. त्यामुळे चित्रपटाचे भविष्य काय हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये शाहरुख आणि दीपिका सैनिकांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. देशाच्या सुरक्षिततेसाठी दोघांवर सोपवल्या गेलेल्या मिशनवर हा चित्रपट आधारित आहे.

चित्रपटातील गाण्यावर वाद झाल्यानंतर डायलॉग बदलण्यास सांगितले आहेत. परंतू ज्या दृश्यावरून मोठा वाद झाला ते दृश्य चित्रपटात तसेच राहणार असल्याचा म्हटले जात आहे. तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह या चित्रपटात जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका असून, २५ जानेवारीला हिंदीसह तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा