कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेट्स तोडून ट्रक गेला फरफटत

7

मुंबई, दि. २० जुलै २०२०: पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली स्टेशन जवळ रेल्वे लाईनचे काम चालू आहे. या कामासंदर्भात मालवाहतूक करत असलेल्या एका ट्रकला रेल्वेने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ट्रक फरफटत पुढे गेला. फरफटत पुढे जात असताना बाजूला असलेल्या दुभाजक देखील तुटले गेले. ट्रकचा मागचा भाग रुळामध्ये अडकल्याने येणाऱ्या रेल्वेने ट्रकला मागून धडक दिली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण लक्ष देण्यासारखी ही बाब आहे की, लाइनचे काम सुरु असताना, रेल्वे मार्गावर ट्रक आला कसा? यामध्ये कुणाचा हलगर्जीपणा आहे का? याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघात झालेल्या ठिकाणची माहिती घेतल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली स्टेशन जवळ सहाव्या लाईनचे काम सुरू होते त्या संदर्भात हा ट्रक मालवाहतूक करत होता. ट्रक जात असताना बांद्रा टर्मिनस ते अमृतसर ट्रेन या ट्रकला धडकली धडकेमध्ये ट्रकचा मागचा भाग पूर्णपणे मोडला आहे. परंतू कोणीही जखमी झालेले नाही किंवा जीवितहानी झाली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा