परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी उरळी कांचन येथून धावणार रेल्वे

उरळीकांचन, दि ७ मे २०२० : लाँकडाऊन मुळे अडकलेल्या परप्रांतीयांना जाण्यासाठी उरुळी कांचन रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली, असल्याचे माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, यांनी उरुळी कांचन येथे दिली.
पिंपरी – चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार व मजूरांना, त्यांच्या मुळ गावी – राज्यात रेल्वेने परत पाठविण्यासाठी लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

याविषयी माहिती देताना देशमुख म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर, काही दिवसांत उरुळीकांचन येथून परराज्यात कामगार घेऊन जाणाऱ्या रेल्वे सोडण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळालेल्या परप्रांतीय कामगार व मजूरांना, प्रशासनाच्या नियोजनानुसार ते राहत असलेल्या सध्याच्या ठिकाणावरुन उरुळी कांचनला प्रवाशी बसमधून आणले जाणार आहे. तसेच उरुळी कांचन येथे कामगार पोहचल्यानंतरच उरुळी कांचन येथील एका विद्यालयात बस थांबवून कामगारांची प्राथमिक तपासणी करुन संबधितांना तात्काळ रेल्वेत बसविण्यात येणार आहे.

त्या विद्यालयात औषध फवारणी करण्यात येणार आहे. सर्व बसेसमध्ये पण औषध फवारणी होणार असुन रेल्वे मध्ये औषध फवारणी करण्यात येणार आहे. उरुळी कांचन मधील ग्रामस्थांना कसलाही त्रास होणार नसल्याची काळजी घेतली जाणार आहे.

टप्या – टप्याने एका वेळेस सोशल डिस्टन पाळून बाराशे ते तेराशे नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविले जाणार आहे. या कामी उरुळी कांचन ग्रामपंचायत पुर्ण मदत करणार असून त्यांचे सहकार्य खुप मोलाचे असल्याचे त्यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार विवेक जाधव, मंडल अधिकारी दिपक चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे, उपसरपंच जितेंद्र बडेकर, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य देविदास टिळेकर, आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

2 प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा