सोलापूर, दि. १६ जुलै २०२०: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण उद्या प्लस मध्ये येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकरच उजनी धरणाने मायनस मधून रिटर्न घेतला आहे. गेली चार ते पाच वर्षानंतर यंदा प्रथमच जून जूलै मधे दमदार पावसाने उजनी धरण क्षेत्रात व माढा तालुक्यात जवळपास २४५ मि.मी पावसाची नोद झालेली आहे. गेल्या वर्षी उजनी ३० जूलैला प्लसमधे आले होते. यावर्षी पंधरा दिवस अगोदर म्हणजे १४ मे ला मायनस मधे गेलेले धरण दोन महिन्यात पुन्हा प्लसमधे आले आहे. अध्यापही पुणे जिल्ह्यातील कोणत्याही धरणातून उजनीत विसर्ग होत नसून धरण जलाशयावर पडलेल्या पावसाचा फायदा झाला आहे. दरम्यान उजनीत दौंडमधून अजूनही २५०० क्यूसेकनी पाण्याचा प्रवाह येत आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील भीमा खो-यातील धरण साठ्यात अजूनही मोठा पाऊस झाला नसल्याने संथगतीने वाढ होताना दिसून येते.भीमा खो-यात पडलेला पावसाचा फायदा हि धरणे भरल्यानंतर १९ धरणातील पाणी हे उजनीत सोडले जाते.
पुणे जिल्ह्यातील भीमा खो-यातील धरणाची सद्यस्थिती
१)पिंपळजोगे ०.०%
२)माणिकडोह ८.६५%
३)वडगाव ३५.८५ %
४)वडज २५.५६ %
५)डिंबे ३१.८० %
६)घोड २४.३१ %
७)वीसापूर २७.३३ %
८)कळमोडी ३३.११%
९)चासकमान १३.९३ %
१०)भामाआसखेड ४०.७१%
११)वडिवळे २०.६०%
१२)आंद्रा ६८.६२ %
१३)पवना ३४.४५%
१४)कासारसाई ४०.४७ %
१५)मुळशी २१.५९ %
१६)टेमघर १४.८५ %
१७)वरसगाव २६.८५ %
१८)पानशेत 36.२८ %
१९)खडकवासला ४३.३४ %
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी ४९०.९७५ मीटर
एकूण पाणी साठा १७९१.९८ दलघमी (टीएमसी ६३.२८)
उपयुक्त पाणी साठा वजा १०.८३ दलघमी
(-०.३८)
टक्केवारी वजा ०.५०
दौंडमधून आवक
२२२३ क्यूसेक
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील