भारतातील दुर्दैवी विमान अपघात

पुणे, ९ ऑगस्ट २०२०: भारतातील केरळमधे दुर्दैवी विमान अपघात झाला. ज्यामधे महाराष्ट्राचे पायलट दीपक साठे यांचा मृत्यू झाला. देशाची सेवा करता करता ते शहिद झाले, अशी प्रतिक्रीया पायलटच्या आई-वडीलांकडून आली. तर केंद्राने मृतकांच्या कुंटूबाला १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. भारतात असे अनेक विमान पघात झाले आहेत. ते कधी आणि कुठे झाले ते आपण पहाणार आहोत.

भारतातील मोठे विमान अपघात:

• १९५८ : गुडगावमधे विमान आपघात झाला ज्यामधे ४ जणांचा मृत्यू झाला.

• ७ जुलै १९६२ : एलटालिया विमान मुंबईच्या पहाडी भागत धडकले ज्यामधे ९४ प्रवासी मृत्यू मुखी पडले.

• २८ जुलै १९६३ : युएईचा विमानाचा मुंबईत अपघात झाला ज्यात ६३ प्रवासी  ठार झाले. 

• १९ सप्टेंबर १९६५ : पाकिस्तान ने सीमेवर भारतीय विमान पाडले ८ जणं ठार. 

• १४ जून १९७२ : जापान एयरलायन्सचे विमान दिल्लीत कोसळले ८५ जणं त्यात दगावले.

• ३१ में १९७३ : दिल्ली विमान कोसळले ४८ जणांचा मृत्यू.

• १२ ऑक्टोंबर १९७६ : मुंबई मधे इंडियन एयरलाइन्सच्या विमानाला आग ९५ जणं ठार.

• १ जानेवारी १९७८ : एयर इंडियाचे विमान मुंबईत कोसळलं २१३ जणाचां मृत्यू.

• २१ जून १९८२ : मुंबईच्या सहारा विमानतळावर एयर इंडियाच्या विमानला आपघात १७ मृत्यूमुखी.

• १९ ऑक्टोबर १९८८ : अहमदाबादेत विमान आपघात १३३ जणांचा मृत्यू.

• १६ जुलै १९९१ : इंफाळमधे विमान कोसळले सर्व ६९ प्रवशांचा मृत्यू.

• २६ एप्रिल १९९३ : इंडियन एयरलाइन्सचे विमान औरंगाबादमधे रणवेवरुन उतरत पुढे ट्रकला धडक दिली ज्या मधे ५५ प्रवशांचा मृत्यू.

• १२ नोव्हेंबर १९९६ : विमानाची विमानाशी हवेत धडक ३४९ प्रवासांंचा मृत्यू.

• २२ मे २०१० : मंगरुळ एयरपोर्टवर विमान कोसळले १५८ जाणांचा मृत्यू.
 
अशा प्रकारे देखील भारतात अनेक मोठमोठे विमानाचे अपघात झाले आहेत, ज्यामधे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा