काबुल, १ सप्टेंबर २०२१: १९ वर्षांहून अधिक काळ अमेरिकेची अफगाणिस्तानातील उपस्थिती संपुष्टात आली आहे. अमेरिकेची शेवटची तीन लष्करी विमानेही सोमवारी रात्री उशिरा काबूल विमानतळावरून उडाली. अहवालांनुसार, अमेरिकन लष्कराची शेवटची तीन C -17 विमाने ३०-३१ ऑगस्टच्या मध्यरात्री काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण झाली आणि यासह अफगाणिस्तानातील अमेरिकेचे लष्करी ऑपरेशन संपुष्टात आले.
अमेरिकेच्या सैन्याने अंतिम मुदतीपूर्वी अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. अमेरिकेचे शेवटचे विमान काबूलमधून उडाल्यानंतर तालिबान आनंद साजरा करत असताना, अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नवीन राजवटीला मोठा धक्का दिला आहे. खरं तर, सोमवारी देश सोडण्यापूर्वी, अमेरिकन लष्कराने काबुल विमानतळावर मोठ्या संख्येने विमान, सशस्त्र वाहने आणि अगदी हायटेक रॉकेट डिफेन्स सिस्टीम डिसेबल केली आहेत. अमेरिकन जनरलने ही माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी म्हणाले की, हमीद करझई विमानतळावरील ७३ विमानांना लष्कराने डिमिलिट्राइज्ड केले आहे, याचा अर्थ या विमानांचा यापुढे वापर होणार नाही. ते म्हणाले, “ती विमाने आता कधीही उडू शकणार नाहीत … कोणीही त्यांना चालवू शकणार नाही.”
ते पुढे म्हणाले, ‘१४ ऑगस्टपासून बचावकार्य सुरू करून अमेरिकेने काबूल विमानतळावर सुमारे ६००० सैनिक तैनात केले होते. यामुळे विमानतळावर ७० एमआरएपी बख्तरबंद वाहनेही नष्ट झाली आहेत. अशा वाहनाची किंमत सुमारे एक दशलक्ष डॉलर्स आहे. या व्यतिरिक्त, २७ ‘हमवीज’ वाहने देखील बंद करण्यात आली आहेत, जी यापुढे कोणीही वापरू शकणार नाहीत.
अफगाणिस्तानात, अमेरिकेने रॉकेट, आर्टिलरी आणि मोर्टारविरोधी सी-रॅम प्रणाली देखील सोडल्या आहेत, ज्याचा उपयोग विमानतळाचे रॉकेट हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी केला गेला. या सिस्टममुळे सोमवारी इस्लामिक स्टेटकडून ५ रॉकेट हल्ले झाल्यानंतरही काबूल विमानतळ सुरक्षित राहिले.
मॅकेन्झी म्हणाले, “शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानातून उड्डाण होईपर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या सिस्टम चालवल्या.” या सिस्टमना तोडणे ही एक जटिल आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे. म्हणून आम्ही या सिस्टमना डिमिलिट्राइज केले जेणेकरून कोणीही त्यांचा वापर करू शकणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे