दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे अमेरिकेचे म्हणणे

अमेरिका, २६ जून २०२० : अमेरिकेने असे म्हटले आहे की, प्रादेशिक लक्ष केंद्रित असलेल्या दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान हा एक सुरक्षित ठिकाण आहे. दहशतवादावरील वार्षिक कंट्री रिपोर्टमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थळींच्या यादीमध्ये समावेश असलेल्या देशांपैकी एक देश म्हणजे पाकिस्तान आहे.

त्यात म्हटले आहे की, पाकिस्तान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेएम) यासारख्या दहशतवादी संघटनांना आपल्या हद्दीतून कार्य करण्यास आणि भारताला लक्ष्य करण्यासाठी परवानगी देते. अमेरिकेने म्हटले आहे की, जेएमएमचे संस्थापक आणि यूएन ने घोषित केलेला दहशतवादी मसूद अझर पाकिस्तानात मोकळा फिरत आहे. अशा दहशतवाद्यांविरूद्ध इस्लामाबादने कारवाई केली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा