आगामी निवडणूक शरद पवारांशिवाय? ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्लॅन B?

मुंबई : १६ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत करत ते ४० आमदारांसह सरकारमध्ये गेले. त्यामुळे शिवसेनेत जशी स्थिती निर्माण झाली तशीच स्थिती उभी केली आहे. अजित पवार यांनी बंड केले त्याला जवळ जवळ दोन महिने होत आहेत. मात्र या मधल्या कळात बंडानंतरही अजितदादांनी आत्तापर्यंत चार वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याच्या आधी घेतलेल्या तीन बैठकीवरून जेवढा गदारोळ आणि संभ्रम निर्माण झाला नाही तितका पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी झालेल्या गुप्त बैठकीने झाला आहे.

त्यावरून आता महाविकास आघाडीतच मोठी खळबळ उडाली आहे. तर अशा गाठीभेटींमुळे शरद पवार गटाचे नेमके काय चालले आहे? असा प्रश्न ठाकरे गट आणि काँग्रेस करताना दिसत आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुका पाहता ठाकरे गट आणि काँग्रेसकडून शरद पवार यांनाच आता आघाडीच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे कळत आहे. तर आता आगामी निवडणुका या शरद पवारांशिवाय लढण्यासाठी आखणी देखील ठाकरे गट आणि काँग्रेसकडून केली जात आहे. याबाबत ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्लॅन बी सुद्धा तयार आहे अशी माहिती समोर येतेय.

याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दोन नेत्यांमधील भेट यावर हाय कमांड निर्णय घेतील. त्याबाबतीत आमच्या पातळीवर आम्ही काही करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर इंडिया च्या बैठकीमध्येही हा विषय मांडण्यात येईल. असे पटोले म्हणाले. त्याचबरोबर भाजप विरोधात लढण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणूक लढवण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसने बी प्लॅन तयार केल्याचे समजते. यावर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी विचारले असता, माझ्यापर्यंत यातील कुठलीही गोष्ट अजून आलेली नाही. दोन नेत्यांमध्ये चर्चा चालू असल्याचे सुप्रिया सुळे यांना विचारले असता, आत्ता तर चर्चा, चहा प्यायचा की कॉफी प्यायची अशी सुद्धा आहे. अशी मिश्किल टिप्पणी सुळे यांनी केली.

नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट झाली यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, असा अजून कोणताही निर्णय झाला नाही. आमचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. आमचा आमच्या नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे. शेवटपर्यंत महाविकास आघाडी नीसंकोच एकत्र राहील, असे विनायक राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा