किंग सलमान यांनीच दिले सौदी पत्रकार जमालच्या हत्येचे आदेश, अमेरिकेचा दावा

वॉशिंग्टन, २७ फेब्रुवरी २०२१: अमेरिकेच्या इंटेलिजेंस डिपार्टमेंटच्या अहवालात म्हटले आहे की, सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान बिन मोहम्मद यांनीच सौदी पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या कटाला मंजुरी दिली. जमाल खाशोगी हत्येप्रकरणी अमेरिकेच्या प्रशासनाने सलमान बिन मोहम्मद यांचे नाव उघडपणे प्रथमच घेतलेले आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियाने हा अमेरिकन अहवाल फेटाळून लावला असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे.

मात्र, बिडेन प्रशासनाने शुक्रवारी एक गुप्तचर अहवाल प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, अमेरिकेमध्ये राहणाऱ्या सौदी पत्रकार जमाल खगोशीला पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यास सांगितले गेले होते त्या कारणास्तव सौदी क्राउन प्रिन्सने आपली परवानगी दिली होती. खगोशी सलमान बिन मोहम्मद यांच्यावर सडेतोड टीका करायचे.

सौदीचे क्राउन प्रिन्स नकार देत आहेत की त्यांनी जमाल खगोशीच्या हत्येचा आदेश दिला होता. २ ऑक्टोबर २०१८ रोजी इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावासात सौदी पत्रकार जमाल खगोशीची हत्या करण्यात आली. या क्षणी अमेरिकेने सौदी अरेबियाच्या राजकुमारांवर कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाची घोषणा केलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा