अमेरिका करणार चिनी दूतावास बंद

वॉशिंग्टन, दि. २३ जुलै २०२०: अमेरिकेने ह्युस्टनमधील चीनी दूतावास बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर चीनने प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने म्हटले आहे की अमेरिकेची बौद्धिक संपत्ती आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्यासाठी ह्यूस्टनमधील चिनी दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन म्हणाले की, अमेरिकेने मंगळवारी दूतावास बंद करण्याची मागणी केली होती. वांग म्हणाले की, अमेरिकेचे हे पाऊल अभूतपूर्व मार्गाने संघर्ष वाढवणार आहे. चिनी दूतावास व अमेरिकेतील मुत्सद्दी यांनाही धमकीचे कॉल येत असल्याचे त्यांनी सांगितले. वांग म्हणाले, अमेरिकेने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी चीनची मागणी आहे. अमेरिका जर यावर पुढे गेले तर चीन त्यास प्रतिसाद म्हणून कारवाई करेल.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चीनने अमेरिकन राजदूतांकडे सद्भावना दर्शविली आहे आणि अमेरिकेतील त्यांच्या राजदूतांनी अमेरिका-चीन संबंध मजबूत केले आहेत. याउलट अमेरिकेने जूनमध्ये चिनी राजदूतांवर सर्व प्रकारचे निर्बंध लादले. अमेरिकेने त्यांचे मेल आणि अधिकृत संदेशही जप्त केले. वांग म्हणाले, अमेरिकेतून जाणीवपूर्वक द्वेषपूर्ण कारवाई केल्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या चीनी राजदूतांना जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

वांग म्हणाले, चीनमधील अमेरिकी दूतावासाने चीनवर हल्ले करणारे अनेक लेख लिहिले आहेत. कोण कोणाच्या देशातील आंतरिक गोष्टींमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत आहे व देशांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. ते म्हणाले, अमेरिकेचा असा दावा आहे की चीन-अमेरिका संबंधांमध्ये असंतुलन आहे, याला त्यांचा नेहमीचा निमित्त आहे ज्याचा कोणताही आधार नाही. खरं तर, राजदूत आणि मुत्सद्दी संस्थांची संख्या विचारात घेता, चीनपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे.

परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॉर्गन ऑर्टॅगस म्हणाले, अमेरिकन लोकांच्या बौद्धिक संपत्ती आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाच्या उद्देशाने चीनला ह्युस्टन दूतावास बंद करण्याचे सांगण्यात आले. ऑर्टगस म्हणाले की, अमेरिका हे कधीही मान्य करणार नाही की आमच्या नागरिकांची संप्रभुता व खाजगी गोष्‍टींविषयी चीन उल्लंघन करेल. जसे की ही आम्ही चीन सोबत होत असलेल्या व्यापार यादरम्यान चीनकडून केलेल्या चुकांना दुर्लक्षित केले नाही किंवा होणाऱ्या चुका देखील मान्य केले नाही.

ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, अमेरिकेने चीनला दूतावास बंद करण्यासाठी ७२ तास दिले होते. हू म्हणाले की, हा वेडेपणा आहे. हॉस्टनचे दूतावास अमेरिकेतील चीनचे पहिले दूतावास होते. अमेरिकेने केवळ ते बंद करण्यास सांगितले नाही तर ते रिकामे करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. हे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. अमेरिकेमध्ये काही लोक कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात प्रशासन कोणत्याही थराला जाण्यास तयारच आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा