डेक्सामेथासोन औषधाचा वापर ठरतोय प्रभावी

ब्रिटन, दि. १८ जून २०२०: कोविड -१९ विषाणूने पूर्ण जगभरामध्ये थैमान घातले आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या विषानुवर उपचार करण्यासाठी औषधे तसेच लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आता ब्रिटनमध्ये नव्या औषधाचा वापर केला जात आहे. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत डेक्सामेथासोन औषधाचा वापर करून २००० रूग्णांवर उपचार करण्यात आला असून या चाचणीत बर्‍याच रुग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

डेक्सामेथासोन हे औषध नवीन वाटत असले तरी हे आधीपासूनच अस्तित्वात आहे. या औषधाचा कोरोनावर प्रभावी उपचार पाहता ब्रिटनने कोरोना रूग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिली. डेक्सामेथासोन औषध विशेषत: व्हेंटिलेट, ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर उपायकारक असून अद्याप सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा कितपत फायदा होत आहे, याबाबत संशोधन झालेले नाही.

जे रुग्ण अतिदक्षता खाली आहेत तसेच ज्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे अशा रुग्णांसाठी हे औषध महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा