पिंपळीतील गावठी दारु अड्डा पोलिसांकडून उद्धवस्त

बारामती, ५ फेब्रुवरी २०२१: पिंपळी येथे सुरु असलेल्या रासायनिक गावठी हातभट्टीच्या दारुअड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात ५० हजारांच्या गावठी दारुसह अन्य साहित्य असा ५२ हजार रुपयांचा माल नष्ट करण्यात आला.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी वैशाली शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार उषा उर्फ अलका शशिकांत पार (रा. मॅकडाॅल कंपनीच्या मागे, पिंपळी) हिच्या विरोधात सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीसह मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (दि.५) रोजी ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी पंचांसह येथे छापा टाकला असता अलका पवार ही हातात काठी घेवून रसायन हलवत असताना दिसून आली. शासकिय जागेत जमिन खोदून गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी तिने कालव्याचे तसेच पर्यावरणाचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिच्याकडून ५० हजार रुपयांचे ५ हजार लिटर रसायन व अन्य साहित्य जप्त करत पोलिसांनी ते नष्ट केले.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा