सोलापूर, दि. ६ मे २०२० : पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील वन क्षेत्रामध्ये ४०० पेक्षा जास्त गायी व २०० पेक्षा जास्त हरणे आणि काळवीटे व इतर वन्यजीव आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या वन्यजीवांना विविध स्वयंसेवी संस्थेकडून चारा पुरवठ्याचे काम केले जात होते.
मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या वन्यजीवांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीकडे या जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी अशी आग्रहाची मागणी केली होती.
सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी बार्डी येथे जावून वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये अंदाजे ३०० हुन अधिक गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे आता या पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: