5G ची प्रतीक्षा लवकरच संपणार! या दिवशी अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता

नवी दिल्ली, ३ जुलै २०२१: 5G ची बरीच चर्चा सध्या देशभरात होत आहे. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की देशात 5G कधी सुरू होणार आहे. आत्ता, टेलिकॉम कंपन्यांना त्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी स्पेक्ट्रम त्यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याच्या उपलब्धतेवर नवीन अहवाल आला आहे.

देशात 5G कधी उपलब्ध होईल, हे अहवालात सांगण्यात आले आहे. द हिंदू बिझिनेस लाइनने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी परिचित सरकारी अधिकारी असे सांगत आहेत की लवकरच 5G भारतात सुरू होणार आहे. आता त्याला जास्त वेळ नाही.

अहवालानुसार ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतात 5G लाँच केले जाऊ शकते. म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी 5G भारतात येऊ शकते. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये 5G तंत्रज्ञान सुरू केले जाऊ शकते.

द हिंदू बिझिनेस लाइनला मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान १५ ऑगस्ट २०२२ रोजी अधिकृतपणे हे लाँच करू शकतात. यामध्ये सर्वात मोठे आश्चर्य दिसून येईल की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये बरीच भारतीय टेक्नॉलॉजी वापरली जाईल.

अहवालात असेही म्हटले आहे की एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि क्वालकॉम सारख्या बड्या कंपन्या भारतात 5G हार्डवेअरवर काम करत आहेत. हुवावे आणि झेडटीई याबद्दल विचारले असता सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, इतर अनेक कंपन्या जगासाठी 5G तंत्रज्ञानावर काम करत आहेत. अनेक स्थानिक प्लेयर यात सक्षम आहेत.

गेल्या महिन्यात इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, 5Gचा लिलाव पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच २०२२ मध्ये होऊ शकतो. तर बिझिनेस लाइनच्या नव्या अहवालात असा दावा केला गेला आहे की त्याचा लिलाव या वर्षाअखेरीस करता येईल. जर सर्व काही ठीक झाले तर आपण लवकरच आपल्या 5G फोनवर 5G सेवेचा आनंद घेऊ शकाल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा