नवी दिल्ली, १ नोव्हेंबर २०२२: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं की ते लवकरच अनन्य वापरासाठी डिजिटल रुपी (E-Rupee) चं पायलट लॉन्च सुरू करंल. आता १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
वास्तविक, आता RBI चं स्वतःचं डिजिटल चलन (RBI Digital Currency) प्रत्यक्षात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) १ नोव्हेंबरपासून होलसेल ट्रांजेक्शन साठी डिजिटल चलन सुरू करणार आहे. सध्या तो पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, यामुळं भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, पेमेंट सिस्टम अधिक कार्यक्षम होईल आणि मनी लाँडरिंगला प्रतिबंध होईल. सरकारी सिक्टोरिटीजच्या सेटलमेंटसाठी डिजिटल चलनाचा वापर केला जाईल.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी ९ बँकांची निवड करण्यात आलीय. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा (BoB), युनियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक यांचा समावेश असंल.
डिजिटल चलनाचे फायदे
देशात आरबीआयचे डिजिटल चलन (E-Rupee) सुरू झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्याकडं रोख ठेवण्याची गरज भासणार नाही. तुम्ही ते तुमच्या मोबाईल वॉलेटमध्ये ठेवू शकाल आणि या डिजिटल चलनाच्या चलनावर रिझर्व्ह बँकेचं पूर्ण नियंत्रण असंल. डिजिटल चलन सुरू झाल्यामुळं सर्वसामान्य लोकांसाठी आणि सरकारसोबतच्या व्यवसायासाठीच्या व्यवहारांची किंमत कमी होईल.
याबाबत माहिती देताना आरबीआयनं अलीकडंच सांगितलं की, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) चा उद्देश सध्याच्या चलनाच्या बदलण्याऐवजी डिजिटल चलनाला पूरक बनवणं आणि वापरकर्त्यांना पेमेंटसाठी अतिरिक्त पर्याय देणं हा आहे. विद्यमान पेमेंट सिस्टम कोणत्याही प्रकारे बदलण्याचा हेतू नाही. म्हणजेच तुमच्या व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
केलं अर्थसंकल्पात जाहीर
सीबीडीसी हे केंद्रीय बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या नोटांचं डिजिटल रूप आहे. जगभरातील बहुतांश केंद्रीय बँका सध्या CBDC जारी करण्याचे मार्ग शोधत आहेत आणि जारी करण्याच्या पद्धती प्रत्येक देशाच्या विशिष्ट गरजांनुसार बदलतात. भारत सरकारनं सर्वसाधारण अर्थसंकल्पात २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून डिजिटल रुपया सादर करण्याची घोषणा केली होती.
यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं होतं की, पायलट प्रोजेक्टची व्याप्ती जसजशी वाढत जाईल, तसतशी आरबीआय E-Rupeeशी संबंधित वैशिष्ट्यं आणि फायदे सामायिक करत राहील. लोकांमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एक कन्सेप्ट नोट जारी केलीय.
डिजिटल रूपी किंवा डिजिटल चलन ही देखील त्याच डिजिटल अर्थव्यवस्थेची पुढची पायरी असंल. ज्याप्रमाणं मोबाईल वॉलेटमधून काही सेकंदात व्यवहार होतात, त्याचप्रमाणं डिजिटल मनीही चालंल. यामुळं रोख रकमेचा त्रास कमी होईल, ज्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे