उजनी धरणातील पाण्याची पातळी एका दिवसात ५ टक्क्यांनी वाढली; आता पाणीसाठा ३५%

माढा, दि १४ आँगस्ट २०२०: पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. भीमा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणसाठ्यात वाढ होत आहे. एकूण 123 टीएमसी पाणीसाठा असलेल्या उजनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ८१.९४ टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे. सततच्या पाऊसाने खडकवासला, कळमोडी, कासारसाई या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीकडे येणारा पाण्याचा हेवा गुरुवार पेक्षा शुक्रवारी वेगाने वाढताना पाहायला मिळाला. एका दिवसातच उजनी धरणाची पाणी पातळी पाच टक्क्यांनी वाढली आहे.   

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बंडगार्डन मधून २१२७७ क्युसेक विसर्ग सुरू असून दौंड मधून २३८१९ क्यूसेकने विसर्ग होत आहे. यामुळे उजनीची पाणीपातळी 50 टक्के कडे वाटचाल करत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर उजनी धरण येत्या चार ते पाच दिवसात पन्नास टक्क्यांची पाणी पातळी पार करेल. 

उजनी धरणाची पाणी पातळी:

दि . १४ ऑगस्ट २०२०, संध्या ०६:०० वाजता.  
पाणी पातळी : 493.380 मीटर
एकूण साठा : 2320.72 दलघमी
उपयुक्त साठा : 517.91दलघमी
टक्केवारी : 34.14%
बंडगार्डन विसर्ग : 21277 क्यूसेक
दौंड विसर्ग : 23819 क्यूसेक
एकूण पाऊस 471 मी.मी.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा