गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा स्त्री फिर आ गई! स्त्री २ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्त्री फिर आ गई! स्त्री २ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई,१५ एप्रिल २०२३: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट, स्त्री अजूनही बॉलीवूडमध्ये बनवलेल्या सर्वोत्कृष्ट हॉरर-कॉमेडीपैकी एक मानला जातो. क्लायमॅक्स सीन मुळे पुढे काय होतं हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी सर्व कलाकारांसह दिग्दर्शक अमर कौशिक दुसरा भाग प्रदर्शित करण्याच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी मुंबईतील जो स्टुडिओच्या इव्हेंटमध्ये स्त्री २ चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर केली.

राजकुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्त्री २ ची घोषणा केली.त्याने पोस्टला कॅप्शन दिले,स्त्री फिर आ गई! तुमची मन जिंकण्यासाठी मॅडॉक फर्म्स आणि जिओ स्टुडिओ तुम्ही प्रेमात पडलेल्या त्या स्त्रीशी तुमची पुन्हा एकदा ओळख करून देणार आहे. भेटणार भेटणार सगळ्यांना भेटणार! 24 ऑगस्ट २०२४ ला सर्वांना #स्त्री २ भेटणार.

https://www.instagram.com/reel/CrDC1U0A2rG/?igshid=MjljNjAzYmU=

व्हिडिओमध्ये, स्त्रीच्या दिसण्याने राजकुमार राव घाबरलेला दिसत आहे. श्रद्धा कपूरने स्टेजवर अचानक प्रवेश केला आणि राजकुमार, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांनी आगामी काळात खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे असे म्हणत स्त्री २ या चित्रपटाची घोषणा केली. बरं, व्हिडिओ खूप विनोदी आणि भितीदायक आहे. स्त्री २ मध्ये काय होईल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.

error: Content is protected !!
Exit mobile version