बुलगारी, १७ नोव्हेंबर २०२० : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या जलंबच्या सुरभी येथील महिला बचत गटानं यंदाच्या दिवाळीत ‘गोधन दिवाळी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गायीच्या शेणाला प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत किंमत मिळावी या उद्देशानं २५ हजार गोमय पणत्यांच्या विक्रीचा संकल्प केला आहे.
दीपावलीत गोधनाचं पूजन केलं जातं. गोमातेला जेवढं महत्व आहे. तितकंच महत्व आरोग्यदायी शेणालाही आहे. हा धागा पकडून शेणापासून या बचत गटानं दिप निर्मितीला २ महिन्यापुर्वीच सुरवात केली. महिला बचत गटातील महिलांना रोजगार आणि गोमय दीवे तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा सुरभी हा जिल्ह्यातील एकमेव बचत गट आहे.
‘गोमय वसते लक्षमी’ या उक्ती ला सार्थ ठरवत जलंबच्या या सुरभी बचत गटानं आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, लातूर दिल्ली, जयपूर, सुरत, बंगळुरू इथे १५ हजार दिव्याची विक्री केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी