माढा, ऑक्टोबर २०२०: माढा तालुक्यातील भीमनगर येथे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे ऑफिस असून या विभागामार्फत वेगवेगळ्या कामांसाठी आँनलाईन टेंडर निघत असते. परंतु तीन लाखांच्या आतील कामाचे टेंडर निघत नसून हे काम उजनी धरण व्यवस्थापन विभागाला म्हणजेच कार्यकारी अभियंता यांना देण्याचा अधिकार असून या कामात अनियमितता असून सतत मर्जीतल्या ठेकेदारांना ही कामे देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असल्याचे श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्था भिमानगरचे अध्यक्ष धनाजी कारंडे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा १२ आँक्टोंबर रोजी कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन तहसील कार्यालय माढा, उपविभागीय अधिकारी माढा,कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांना देण्यात आले असून पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनाजी कारंडे यांनी यावेळी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील