दौंड, २९ ऑगस्ट २०२०: दौंड येथील कुरकुंभ रेल्वे मोरीच्या अंतीम टप्प्यातील कामकाजाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी कुरकुंभ मोरीच्या समस्यांबाबत निवेदन देवून संबंधित रेल्वे अधिका-यांना सूचना कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
दौंड शहराचा जिव्हाळयाचा प्रश्न असलेल्या कुरकुंभ मोरीचे काम मंजूर होऊन चालू झालेले आहे. परंतु जुन्या व नव्या कुरकुंभ मोरी परिसरातील काही समस्या दूर होणे गरजेचे आहे. या समस्या पुढीलप्रमाणे असल्याचे निवेदनाद्वारे जगदाळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सध्याच्या जुन्या व नव्या मोरीच्या तोंडा जवळ लावलेल्या लोखंडी जाळ्या अ-समान असल्याने त्या दुरुस्त कराव्यात किंवा त्याठिकाणी बंदिस्त गटार करुन त्या जाळ्या काढून टाकणे. शालीमार चौक, घंटेचाळ, आर.पी.एफ.च्या उतारावरून येणारी गटारे बंदिस्त करणे. जुन्या मोरीच्या भिंत व छताचा स्लॅबमधून पावसाचे पाणी येत असल्याने त्याची दुरुस्ती करणे. दोन्ही मोरींमध्ये पूर्वीप्रमाणे टयुबलाईट किंवा एलईडीची व्यवस्था करणे. नव्या मोरीत लोकांना पायी जाण्यासाठीच्या मार्गावर लोखंडी कठडे बसविणे.
त्याचप्रमाणे हे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. स्वत: मी व काही कार्यकर्ते यांनी या कामास भेट दिली तेव्हा खालील गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यापैकी आर.सी.सी.बॉक्स तयार झालेला आहे. पुशींग सिस्टीम तयार आहे. ही कामे झालेली आहेत. प्रत्यक्ष काम करणा-या लोकांशी आम्ही चर्चा केली असता काही गोष्टी रेल्वे खात्याकडून होणे अद्यापही बाकी आहे त्यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टी आहेत. रेल्वे रुळाखाली (ट्रॅकखाली ) सेफ्टीसाठी रेल क्लस्टर बसविणे. रेल क्लस्टर बसविल्याशिवाय काम सुरु करणे शक्य नाही. ओ.एच.ई.(इलेक्ट्रीक पोल) शिप्ट करणे हे रेल्वे इलेक्ट्रीक विभागाचे काम आहे ते करणे कामी सुचना कराव्यात. ज्या ठिकाणी कुरकुंभ मोरीचे काम सुरु आहे.
त्याठिकाणी सर्व प्रकारच्या केबल्स आहेत (ओ.एफ सी.केबल, सिग्नल केबल, टेलीफोन केबल, इंटरलॉकींग केबल इत्यादी) शिफ्ट करणे. इत्यादी कामे त्वरीत करणे गरजेचे असल्याचे जगदाळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे , इंद्रजित जगदाळे, सोहेल खान व मान्यवर उपस्थित होते. फोटो ओळ: दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीचे अंतीम टप्प्यातील कामकाज पाहतांना सुप्रिया सुळे , रमेश थोरात , विरधवल जगदाळे आणि मान्यवर.
न्यूज अनकट प्रतिनिधी :