जग करत आहे गव्हाच्या संकटाचा सामना, भारत जगाला पोसण्यासाठी तयार, बर्लिनमध्ये पंतप्रधान मोदींचं आश्वासन

नवी दिल्ली, 3 मे 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत आहेत. यावेळी ते म्हणाले की, आता जग भारताला लहान समजत नाही. भारताकडं सध्या इतका स्वस्त डेटा आहे की अनेक देशांसाठी तो अकल्पनीय आहे. ते म्हणाले की, भारतात कुठेही फिरताना खिशात रोख रक्कम बाळगण्याची सक्ती आता जवळपास संपली आहे. यासोबतच संपूर्ण जग गव्हाच्या संकटाचा सामना करत असताना भारतातील शेतकरी जगाला पोसण्यासाठी पुढं येत असल्याचं सांगण्यात येत आहे.


आता अगदी दुर्गम गावांमध्येही मोबाईल पेमेंट केले जाते. ते म्हणाले की, आता केंद्र आणि राज्य सरकार आणि स्थानिक सेल सरकारच्या 10 हजार सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. पंतप्रधान म्हणाले की आता भारतातील बँकेत डायरेक्ट पैसा पोहोचतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवा भारत सुरक्षित भविष्याचा विचार करत नाही, तर जोखीम पत्करतो. आता भारत नवनिर्मिती करतो. ते म्हणाले की 2014 मध्ये आपल्या देशात फक्त 200-400 स्टार्टअप होते, परंतु आज 8 वर्षानंतर भारतात 68 हजारांहून अधिक स्टार्टअप आहेत.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी कंपनी सुरू करणं कठीण होतं, परंतु आता सर्वकाही सामान्य झालं आहे. तसेच तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात स्टार्टअप सुरू करायचा असेल तर ते तुम्ही सहज करू शकता, आता लोकांच्या पायात बेड्या नाहीत असंही त्यांनी सांगितलं.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा