मुंबई, २३ नोव्हेंबर २०२२ : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ‘एअरबल बेलुगा’ नावाचं एक अनोखं विमान उतरलं आहे. या विमानाचे फोटोज नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होऊन वेगाने शेअर होत आहेत. या विमानाचे नेमके काय वैशिष्ट्य आहे? याचे उत्तर म्हणजे हे व्हेल माशासारखे डिझाईन असलेले जगातील सर्वांत मोठे विमान जे आता भारतीयांना पाहण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी जगातील सर्वांत मोठे विमान म्हणून कार्गो एअरक्राफ्ट Antonov AN-225 किंवा म्रिया या नावाने ओळखले जात होते; पण रशिया-युक्रेन युद्धात हे विमान नष्ट झालं. आता अशा विषयाच्या आकाराचे ‘एअरबस बेलुगा’ हेच विमान आहे.
अनेक उत्साही नागरिकांनी या विमानाचे फोटो आपल्या साइटवर शेअर केलेत, तर या विमानाची छायाचित्रे विमान प्राधिकरणानेही ट्विट केली आहेत. अधिकाऱ्यांनी लिहिलंय, मुंबई विमानतळावर ‘एअरबल बेलुगा’ सुपर ट्रान्स्पोर्ट या विमानाचे आगमन झाले आहे. त्याच्या अत्यंत युनिक अशा डिझाईनबाबत तुम्हाला काय वाटतं? या विमानाच्या कॅरियरची लांबी ५६ मीटर आणि उंची १७ मीटर एवढी आहे. ‘ई२’ फॅमिलीतील ‘ई१९२-ई२’ हे विमान नुकतेच मुंबई विमानतळावर उतरले. काही माल उतरवल्यानंतर हे विमान इथून निघून गेले. याआधी रविवारी हेच विमान कोलकाता विमानतळावर इंधन भरण्यासाठी व क्रू सदस्यांच्या विश्रांतीकरित थांबले होते.
या विमानाची रेंज ४० टन वजनाला २,७७९ किलोमीटर आणि २६ टन वजनाला ४,६३२ किलोमीटर एवढी आहे. तर विमानाची इंधन क्षमता ६,३०३ यूएस गॅलन एवढी आहे. विशेष म्हणजे या विभागासाठी फक्त दोन क्रू सदस्यांची गरज आहे. विमान १८४ फूट ३ इंच एवढे लांब आहे. अंतराळ स्पेस शटल नेण्यासाठी सुपर गप्पी नावाचे एक महाकाय विमान १९९५ मध्ये तयार करण्यात आले होते. सुपर गप्पी विमानाला पर्याय म्हणून ‘एअरबस बुलेगा’ हे विमान आता तयार करण्यात आले आहे. हवाई दलातील अनेक उत्साही नागरिकांनी या विमानाचे फोटो आपापल्या साइटवर शेअर करीत या विमानाबद्दलची उत्सुकता प्रदर्शित केली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे