बारामती, दि. २० जून २०२०: बारामती शहरातील आरती राजेंद्र पवार (वय २५ ) वर्षे या सध्या बारामती नगर परिषदे मध्ये करनिरीक्षक म्ह्णून कार्यरत आहेत बारामती शहरातील भिगवणरोड लगत राहणाऱ्या आरती पवार या तरुणीचे सर्व शिक्षण बारामतीतील एम इ एस हायस्कूल व विद्याप्रतिष्टान येथे झाले आहे. आरतीचे वडील राजेंद्र पवार हे झारगडवाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत तर आई ही हाऊस वाईफ आहे.
आरती पवार यांनी पाहिल्या प्रयत्नात एम पी एस सी परीक्षेत मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळविला आरतीने २०१७ साली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. रोज १० ते १२ तास कसून अभ्यास अभ्यास केला आहे. या पूर्वी देखील आरती पवार यांनी सहाय्यक कक्ष अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, तसेच करनिरीक्षक पदी निवड झाली होती मात्र आज उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाल्याचे आरती पवार यांनी सांगितले तसेच भविष्यात अजून मेहनत करून आय ए एस होण्याचे स्वप्न असल्याचे व अजून जास्त मेहनत घेणार असल्याचे सांगितले.
तसेच स्पर्धा परीक्षेची पहिल्याच प्रयत्नात हे यश सध्या केल्याचे पवार यांनी सांगितले आरती पवार यांनी स्पर्धा परीक्षेचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास ठेवा संयम ठेवा कधी हार मानू नका आपला उद्देश सध्या होई पर्यंत हार मानू नका असा संदेश दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव