नगर मधिल वाळकीच्या तरुणांचे उत्तराखंडमध्ये योगदान

अहमदनगर, १४ जुलै २०२३: अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथील तरुणांनी, उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने तब्बल नऊ तास बंद असलेला रस्ता मोकळा करण्यात मोलाचे योगदान दिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग व त्यांचे सहकाऱ्यांचा त्यात समावेश होता. भालसिंग व त्यांचे मित्र उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेला गेले आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली व यामध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत.

रस्ता पूर्णपणे बंद पडला. रात्री उशिरा शासकीय मदत मिळत नसल्याने मनोज भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील लोकांना मदतीला घेऊन मध्यरात्री रस्त्यावरील मोठे दगड बाजूला सरकविण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांतून तब्बल नऊ तासानंतर रस्ता मोकळा झाला. त्यानंतर शासकीय मदत उपलब्ध होऊन स्थानिक पोलिस प्रशासन व अधिकाऱ्यांनी, भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोटे, गणेश बोटे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा