गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पाटेगाव भंडारे वस्तीवर चोरी, सुमारे दोन लाखचा ऐवज लंपास

पाटेगाव भंडारे वस्तीवर चोरी, सुमारे दोन लाखचा ऐवज लंपास

कर्जत, दि.१ जुन २०२०: कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे रात्री चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर सोलापूर रोडवरील महत्वाचे गाव म्हणून पाटेगावकडे पाहिले जाते. त्याच गावातील भंडारे वस्तीवर बाळासाहेब भंडारे यांच्या घरी चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास चोरी केली.

सविस्तर वृत्त असे की, भंडारे यांच्या घरातील सर्व जण बाहेर झोपले होते. त्याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी घराची कडी आणि कोयंडा तोडून त्यांनी घरात प्रवेश करून घरातील तीन तोळे सोने आणि एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

ज्या वेळी चोर चोरी करून जात होते, त्यावेळी एक व्यक्ती त्यांना पाहून चोर चोर म्हणून ओरडू लागली . त्यामुळे भंडारे हे जागे झाले. तोपर्यंत चोर माहिजळगावच्या दिशेने फरार झाले होते. तात्काळ घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल माने यांनी घटनास्थळी दाखल झाले.

नगर येथील श्वान पथकाच्या सहाय्यानेही तपास करण्यात आला पण काही माग लागू शकला नाही. दरम्यान अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version