इ- लर्निंग खोलीतून साहित्याची चोरी

उस्मानाबाद, दि. ३० जून २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि जनता अतोनात प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीमध्ये गरज नसताना बाहेर फिरण्यास मनाई असल्याकारणाने, काही ठिकाणांत नागरिकांची हालचाल होत नाहीए. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक बाहेर जाणे टाळत आहेत. या स्थितीचा चोरट्यांनी मात्र फायदा उठवायला चालू केले असल्याचे आढळून येत आहे.

वाशी तालुक्यातील मौजे नांदगाव या गावातील जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याचे उघडकीस आले. दिनांक २७ जून ते दिनांक २९ जूनच्या कालावधीत शाळेतील इ-लर्निंग खोलीचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडले, आणि खोलीतील साहित्याची चोरी केली. चोरी झालेल्या या साहित्यात डेल कंपनीचा सीपीयु, कि- बोर्ड, माऊस एकूण ६०००/- रुपये किंमत असणाऱ्या आदी वस्तूंचा सामावेश आहे.

शाळेतील इ-लर्निंग खोलीतून साहित्याची चोरी झाल्याचे आढळून येताच, हनुमंत क्षिरसागर या शिक्षकाने ताबडतोब पोलीसांना कळवले. संबंधित शिक्षणाने दिलेल्या खबरेवरून आज दिनांक ३० जून रोजी पोलीसांनी अज्ञात चोरट्यां विरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा