मुंबई, १९ एप्रिल २०२१: सध्या राज्यात कोरोनाचे थैमान चालू आसून दिवसाला कोरोना रूग्णांची संख्या ६० हजारांच्या घरात जात आहे.आणि या गंभीर परिस्थिती मधे महाराष्ट्रातील राजकरण थांबायचे नाव घेत नाहीये.महाराष्ट्रात विरोधी पक्ष आघाडी सरकाराला मदत करायचे सोडून सतत ताशेरे ओढताना दिसत आहेत.तर आघाडी सरकार ही विरोधकांना प्रत्युत्तर देत आसते.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करत म्हणाले,” सध्या राज्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे.मात्र विरोधी पक्षनेते सरकार पाडायला निघाले आहात.मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते.” अशी टीका केली.
त्यांच्या या टिकेवर भाजप नेते नितेश राणेंनी हि आशीच पातळी सोडून टीका केली.नितेश राणेंनी ट्विट करत.”देवेंद्रजीच्या जवळ जाणे तर लांबच राहीले.हे या गायकवाडाला कोण सांगेल,पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर…कुठे घालायची तिथं घाल…”.
राज्यात कोरोनामुळे आधीच परिस्थिती चिंताजनक झाली आहे.आणि त्यात सत्ताधारी आणि विरोधक स्वतामधेच “तु तु मैं मैं” करण्यात व्यस्त दिसत आहेत.तर सरकार हे या कठिण काळात जनते बरोबरच विरोधकांनही सहकार्य करण्यासाठी विनंती करत आहे.तर विरोधक या उलट भूमिका महाराष्ट्रात बजावताना दिसत आहे.