या प्रवासात अनेक आठवणी आहेत – दिनेश कार्तिकचं भाऊक ट्विट  

मुंबई, १६ ऑगस्ट २०२०: जेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात आला तेव्हा भारतीय संघाचे सेलेक्टर तिन्ही फॉरमॅट मध्ये विकेट किपर फलंदाजच्या शोधात होते. यासाठी दीपदास गुप्ता, अजय रत्रा, एम. एस. के प्रसाद यांना संधी देण्यात आली. परंतु,  या खेळाडूंना काही मजल मारता आली नाही. त्यानंतर २००३ विश्वकप मध्ये राहुल द्रविड यांनी विकेट कीपिंगची कमान सांभाळली.

महेंद्र सिंग धोनीने २००४ साली बांगलादेश विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण, पहिल्या ४ सामन्यांमध्ये फक्त १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध १४८ धावांची खेळी करून धोनीने आपला दबदबा कायम केला. त्यानंतर धोनीने कधीच मागे वळून पाहिले नाही. विकेट किपिंगसाठी भारतीय संघाने दिनेश कार्तिकला ही संधी दिली होती, परंतु  त्याला संधीचा फायदा घेता आला नाही.

तसेच काल १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. त्यात अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिनेश कार्तिकने ही भावूक होऊन धोनी सोबतचा आपला फोटो शेअर करत लिहले आहे की, हा वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर घेतलेला शेवटचा फोटो आहे. या प्रवासात अनेक आठवणी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा