आली नविन दुचाकी, चालवू शकता विना लायसन्स…..

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट २०२०: मित्रानों तुमच्याकडे टूव्हिलर असली तर त्या गाडीला चालविण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज भासते. त्या बरोबकरच गाडीेचे पेपर्स ते वेगळेच. हे सर्व नाही केले तर मग सरळ तुम्हाला दंड भरावा लागतो. या मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे लायसन्स हे नसले तर गाडी जप्त केली जाते व त्याच बरोबर तुम्हाला देखील दंडीत केले जाऊ शकते. मात्र या सर्व गोष्टींवर आता तुम्हाला सवलत मिळणार आहे. डिटेल इंडिया कंपनी तुमच्यासाठी अशीच एक खास गाडी घेऊन येत आहे.

डिटेल डंडिया कंपनीने जगातील सर्वात जास्त परवडणारी इलेक्ट्रिक दुचाकीचे अनावरण केले आहे. या दुचाकीचे नाव कंपनीने “डिटेल इझी” ठेवले आहे. या मध्ये लाल पांढरा आणि काळा रंग असून याची किमंत १९,९९९ रु आहे. हि दुचाकी चालवण्यासाठी लायसन्सची किंवा नोंदणीची गरज नाही. एकदा चार्ज केल्यानंतर हि ६० किलोमीटरचे अंतर कापू शकते. त्या बरोबरच या दुचाकीला ७ ते ८ तास चार्ज व्हायला लागतात. तर या दुचाकीवर दोनजण प्रवास करु शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा