क्रिकेटवेड्या भारतामध्ये फुटबॉटलची अशीही क्रेझ

फुटबॉलच्या वेडापायी केरळमधील नववधू-वराने
जर्सी घालून केला विवाह

पुणे, २० डिसेंबर २०२२ : भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात फुटबॉटलचीही प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. फिफा विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना कतारमध्ये रविवारी (ता.१८) अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झाला. यात अर्जेंटिना विश्वविजेता ठरला. दरम्यान, भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये या सामन्यादरम्यान प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. अशीच एक अनोखी क्रेझ केरळमधील फुटबॉलप्रेमींमध्ये पाहायला मिळाली. केरळमध्ये एका जोडप्याने सामन्यापूर्वी दोन्ही संघांची जर्सी घातली आणि हे दोघेही विवाहबंधनात अडकले. पुन्हा काही वेळानंतर फायनल सामना पाहण्यासाठी वराच्या घरी परतले.

अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघांत कतारच्या लुसेल स्टेडियममध्ये फुटबॉल विश्वकरंडकाचा सामना रंगला होता. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमध्ये खचाखच गर्दी केली होती. सामन्यादरम्यान जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत होती. दरम्यान, केरळमधील सचिन आर. आणि आर. अथिरा या नवविवाहित जोडप्याने फायनल सामन्यादरम्यानचा मुहूर्त शोधला आणि ते विवाहबंधनात अडकले. यामध्ये वधूने फ्रान्सच्या संघाची जर्सी घातली होती, तर वराने मेस्सीच्या अर्जेंटिना संघाची जर्सी घालून विवाह केला. यानंतर या दोघांनीही एकत्र बसून हा सामना बघितला.

वर सचिन अर्जेंटिना स्टार लिओनेल मेस्सीचा निस्सीम चाहता आहे, तर वधू अथिरा फ्रेंच फुटबॉल संघाची समर्थक आहे. या दोघांनीही वधू-वराचा पारंपरिक पोशाख घातला होता. याचबरोबर पोशाखावर या जोडप्यांमधील अथिरा हिने फ्रान्स फॉरवर्ड किलियन एम्बप्पाचे जर्सी घातली होती, तर सचिन याने मेस्सीसाठी अर्जेंटिनाची १० नंबरची जर्सी घातली होती, असे वृत्त मल्ल्याळम ‘मनोरमा’ या वृत्तपत्राने दिले आहे.

लग्नसमारंभ आणि रिसेप्शनदरम्यान या दोघांनीही २०६ किलोमीटर इतकी धावपळ करीत फुटबॉलच्या वेडापायी घरी येऊन जोडीने फुटबॉल विश्वकरंडकाचा सामना देखील पाहिला. त्यांच्या या वेडापायी समाजमाध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा